शिक्षक भरती उमेदवार तरुणीवर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर भडकले,दिली अपात्र करण्याची धमकी

0
28

️️तर या घटनेचा व्हिडीओ झाला सोशल मीडियावर व्हायरल

बीड:– शिक्षक भरतीवरून एका तरुणीची व मंत्री दिपक केसरकर यांच्यात बीड येथे शाब्दिक चकमक झाली. यावेळी केसरकरांनी थेट त्या तरुणीला तु फार बेशिस्त आहेस, तुझी माहिती घेऊन तुला अपात्र करतो; अशी धमकीच दिपक केसरकरांनी त्या तरुणीला दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून केसरकरांच्या या धमकीमुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

बीडच्या कपिलधारा येथे एका कार्यक्रमाला आलेल्या दिपक केसरकर यांना एका शिक्षक भरती उमेदवार तरुणी वेबसाईटबाबत प्रश्न केला. सर्वांसमोर प्रश्न केल्याने केसरकर नाराज झाल्याचे दिसून आले. त्यांनी सुरुवातीपासूनच त्या तरुणीला बडबडायला सुरुवात केल्याचे दिसून आले.

”तुम्हाला अजितबात कळत नाही का? तुम्ही शिक्षक होऊ शकता का? तुमची साईट ओपन झाली आहे. तुम्ही तिथे जाऊन तुमची चॉईस टाका’, असे केसरकर म्हणाले. त्यावर त्या तरुणीने साईट सुरू झाली, रजिस्ट्रेशन झालं पण पुढे काय, पुढे काहीच होत नाहीए. हे असंच सुरू आहे. असे केसरकरांना सुनावले. त्यावर केसरकर भडकले त्यांनी त्या तरुणीला थेट बेशिस्त ठरवलं. ती तरुणी बोलायचा प्रयत्न करत होती. तेव्हा केसरकरांनी तिला अडवत ‘अजिबात मध्ये बोलायचं नाही, नाहीतर तुमचं नाव घेऊन तुम्हाला अपात्र करेन’, अशी धमकीच दिली.