धाराशिव,दि.06:- जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील अंकुश व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगोली, जुनोनी, आंबेहोळ, काळा निंबाला येथील ग्राम बालसंरक्षण समिती मासिक बैठकींचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकांच्या वेळेस क्षेत्रीय कार्यकर्ता जयश्री पाटील व हर्षवर्धन सेलमोहकर यांनी ग्राम बालसंरक्षण समितीचे अध्यक्ष सरपंच, ग्रामसेवक, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, आशा सेविका, सदस्य, सचिव अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील यांना ग्राम बाल संरक्षण समितीची भुमिका, कर्तव्य व जबाबदारी, प्रतिबंधात्मक कार्य व उपाययोजनात्मक कार्य, बाल हक्क, बालविवाह कायदा, बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या यंत्रणा, महिला व बालविकास विभागाअंतर्गत बालकांसंबंधिच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील ग्राम बाल संरक्षण समिती बालकांच्या संरक्षणासाठी व सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी सहाय्यक ठरत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.