– हणमंत गवळे
नांदेड/दि.२४ येथे मुक्ती मिशन च्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मानव मुक्ती मिशन या सौत्रांतिक अब्राम्हणी जातवर्गस्त्रीदास्यांतक संघटनेच्या लोहा तालुकाध्यक्षपदी मारोती भुजबळ यांची तर बिलोली तालुकाध्यक्षपदी कमलाकर जमदाडे यांची निवड करण्यात आली. यावेळी दोघांनाही मानव मुक्ती मिशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत व मानव मुक्ती मिशनचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा सौत्रांतिक साहित्य संघाचे राज्य सेक्रेटरी केतन देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.त्याचबरोबर नितीन सावंत लिखित संत जनाबाई चरित्र व संत चोखोबारायांचे चरित्र सुखाची मिराशी ही पुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नुकतेच आंतरजातीय विवाह करुन जातीअंताच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या कॉ.प्रफुल्ल कऊडकर व कॉ.नेहा मेडलवार या नवविवाहित दाम्पत्याचा संविधानाची उद्देशिका, साडी, दस्ती, टोपी देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीसाठी परभणीहून प्रसाद गोरे, बळी शिंदे, सादीक शेख तसेच कॉ.पल्लवीताई लोमटे, संगीताताई साबळे, अत्राम बुद्धेवाड, अनिल पाटील चीमेगावकर, शेतकरीपुत्र प्रशांत पाटील मुंगल आदी उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आणि नवविवाहित जोडप्याचे सर्वांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.बैठकीचे आयोजक केतन देशमुख यांच्या हस्ते आभार प्रदर्शन करण्यात आले