
हिंगोली : जिल्ह्यात हातभट्टी दारू, रसायनाचा नाश करण्याच्या सूचना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिल्याने ८ जूनला मासरेडच्या केलेल्या कारवाईत २७ ठिकाणी गुन्हे दाखल करून ३७ हजार ९७० रुपयाचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारू ची वाहतुक व विक्री होत असल्याने यावर (Illegal liquor seized) कारवाई करण्याकरीता मासरेडचे आयोजन ८ जूनला करण्यात आले होते. ज्यामध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे, सुरेश दळवे, राजकुमार केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३ ही पोलिस ठाणे हद्दिमध्ये अवैध दारूवर कारवाई करण्यात आली.