Home मराठवाडा जुन्या नोटांमध्ये फेडले 80 हजार कोटींचे कर्ज

जुन्या नोटांमध्ये फेडले 80 हजार कोटींचे कर्ज

0

मुंबई, दि. 10 – 500 आणि 1 हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर बँकांमध्ये झालेल्या व्यवहारांसंबंधी आयकर खात्याने महत्वपूर्ण माहिती दिली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटांमध्ये 80 हजार कोटी रुपयांची कर्जाची परतफेड करण्यात आली.
जे उत्पन्न दाखवायचे टाळले जात होते असे 3 ते 4 लाख कोटी रुपये बँक खात्यात जमा झाले तसेच 8 नोव्हेंबरनंतर 60 लाख बँक खात्यांमध्ये प्रत्येकी 2 लाखापेक्षा जास्त रक्कम जमा झाली. नोटाबंदीनंतर सहकारी बँकांमध्ये 16 हजार कोटी रुपये जमा झाले.
सहकारी बँकांमध्ये जमा झालेल्या 16 हजार कोटी रुपयांची आयकर खाते आणि ईडीकडून छाननी सुरु आहे. नोटाबंदीनंतर चारच दिवसांनी 12 नोव्हेंबरला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशभरातील बँकांमध्ये 2 लाख कोटी रुपये जमा झाल्याची माहिती दिली होती.

Exit mobile version