Home मराठवाडा भोकर येथे रेल्वेरुळ ओलांडतांना रेल्वे अपघातात वृद्ध ठार

भोकर येथे रेल्वेरुळ ओलांडतांना रेल्वे अपघातात वृद्ध ठार

0

नांदेड,दि.18- जिल्ह्यातील  भोकर शहरातील नांदेड – भोकर महामार्गावरील रेल्वे क्राॅसिंग फाटका जवळील काही अंतरावर १७ सप्टेंबर रोजी फाटक बंद असल्याने काही अंतरावरुन धावपट्टी ओलांडतांना रेल्वे अपघातात माै.धानोरा ता.भोकर येथील ७० वर्षीय वृद्ध ठार झाला असून या प्रकरणी रेल्वे पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृत इसमाचे नाव    पुरभाजी लक्ष्मणराव करपे (७०) रा.धानोरा ता.भोकर असे आहे.प्रकृती ठिक नसल्याने उपचारासाठी सकाळी दवाखान्यात आले होते.उपचार करुन गावाकडे जाण्यासाठी ते निघाले असता भोकर रेल्वे स्थानकातून पुर्णा – आदिलाबाद पॅसेंजर रेल्वे क्र.५७५५३ ही सुटल्याने क्राॅसिंग फाटक बंद होते. फाटकापासून काही अंतरावरुन त्यांनी रेल्वे धावपट्टी ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला असतांना  गेट किपरने त्यांना आवाज देऊन दुर जाण्यासाठी सांगीतले व रेल्वे इंजिन चालकाने देखील सिटी वाजविली.परंतू पुरभाजी करपे हे थोडे बहिरे असल्याने त्यांना ते एैकू आले नाही व इंजिनाचा धक्का जोराने लागला.या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघाता बाबद भोकर रेल्वे स्थानक प्रमुखांनी नांदेड रेल्वे पोलीसांना कळविले.यावरुन नांदेड रेल्वे पोलीस विभागाचे जमादार उत्तम कांबळे,पो.काॅ.अतिकेश काळमेघ व पोलीस जिप चालक प्रशांत चाैधरी हे घटनास्थळी उपस्थित होऊन पंचनामा केला.

Exit mobile version