Home मराठवाडा अप्पर पोलीस महासंचालकांनी साधला जनतेशी संवाद

अप्पर पोलीस महासंचालकांनी साधला जनतेशी संवाद

0

नरेश तुप्तेवार
नांदेड,दि.31ः-  महाराष्ट्र  राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक व्हि व्हि लक्ष्मीनारायण नांदेड दौऱ्यावर असून  स्वागत समारोह व जनतेशी सुसंवाद असा दुहेरी कार्यक्रम नानक साई फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे शनिवारी पार पडला.लक्ष्मीनारायण जे 1996 ते 2000 च्या काळात नांदेड येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते महाराष्ट्र राज्याचे अपर पुलिस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.पोलीस खात्याच्या तपासणीसाठी ते नांदेड जिल्ह्यात आले आहेत.नांदेड जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांचाशी नांदेडकरांसोबत चांगले संबध राहिले,नांदेडची जनता हि अधिकाऱ्याला मानसमान देणारी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.नांदेडकरसोबत चांगला सुसंवाद साधता यावा म्हणून नानक साई फाऊंडेशनच्या वतीने पुढाकार घेऊन शनिवारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

Exit mobile version