Home मराठवाडा भाजपाच्याच माजी खासदाराने वांग्यांवर फिरवला नांगर

भाजपाच्याच माजी खासदाराने वांग्यांवर फिरवला नांगर

0

नांदेड,दि.05-  शेतीमाल व दुधाला योग्य भाव मिळविण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला माल रस्त्यावर टाकून सरकारच्या धोरणाचा तीव्र विरोध केला आहे. यात भर पडली आहे भाजपाच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांची.  हिंगोलीचे येथील भाजपाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी आपल्या पाच एकर वांग्याच्या पिकावर ट्रॅक्टर घालून पस्त केले आहे. वांग्याला बाजारात केवळ तीन ते चार रुपये किलोचा भाव मिळत असल्यामुळे सुभाष वानखेडे यांनी सोमवारी वांग्याच्या पिकात ट्रॅक्टर घालून वांग्याची रोपे उपटून टाकली.

माजी खासदार तथा भाजपा नेते सुभाष वानखेडे यांनी वांग्याचे शेत उध्वस्त करुन सरकारला घरचा आहेर दिला. नांदेड जवळील हदगाव येथील आपल्या शेतात सुभाष वानखेडे यांनी पाच एकर मध्ये वांग्यांचे पिक घेतले होते.  बाजारात  वांग्याला फक्त तीन ते पाच रुपये किलो भाव मिळत असल्याने लागवड आणि वाहतुकीचा देखील खर्च निघत नाहीये. त्यामुळे संतप्त झालेल्या वानखेडे यांनी ट्रकटरद्वारे वांग्याचे पाच एकर शेत नांगरुन टाकले.

Exit mobile version