Home मराठवाडा शाळांनी प्रामाणिक अधिकारी व सुजान नागरिक घडवण्याच काम करावं – पो.नि भगवान...

शाळांनी प्रामाणिक अधिकारी व सुजान नागरिक घडवण्याच काम करावं – पो.नि भगवान धबडगे

0
बिलोली (सय्यद रियाज),दि.१७ :लहान मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी ज्या प्रमाणे आई वडील व कुटुंबाबर आहे.त्याच प्रमाणे चिमुकल्या मुलांवर चांगले संस्कार करणे ही शाळांचीही जबाबदारी असून शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रामाणिक अधिकारी व सुजान नागरिक घडवण्याच कामं करावे असे प्रतिपादन बिलोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक भगवान धबडगे यांनी केले.
  ते दि.१५ आँगस्ट स्वातंत्र्य दिनी कार्ला येथील सनशाईन इंटरनॅशनल इंग्रजी शाळेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.यावेळी प्रमुख पाहूने म्हणून पञकार संघाचे अध्यक्ष राजू पा.शिंदे,पोलिस उप निरिक्षक पंतोजी,पञकार बसवंत मुंडकर,सय्यद रियाज यांची उपस्थिती होती.कार्ला (खु)  येथे या वर्षापासून नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या सनशाईन इंटरनॅशनल स्कुल येथे स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरूवात लहान मुलांनी सादर केलेल्या सुंदर अशा देशभक्तीपर गितांच्या नृत्यांनी करण्यात आली.त्यानंतर उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले.तद्नंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी शाळेचे संस्थापक सचिव सत्यनारायण मेरगू,मुख्याध्यापीका प्रेमा .जी मेरगू,हेमा दास,वाय मेरी दास,एसतार लिंकन,के सुर्या सर,अनिल तमलुरे,एम रूक्साना,व्ही मनिषा,शिवकन्या सुरकुटलावार ,व्यंकट सुरकुटलावार, किरण देशमुख ,शंकर लोखंडे , यांच्यासह शाळेतील कर्मचारी व पालक उपस्थित होते.

Exit mobile version