Home मराठवाडा जानकरांच्या हस्ते लहवितकर महाराजांच्या अभंग गाथा ग्रंथाचे प्रकाशन

जानकरांच्या हस्ते लहवितकर महाराजांच्या अभंग गाथा ग्रंथाचे प्रकाशन

0

संगमनेर,दि.03ः तालुक्यातील नान्नज येथे जगद्गुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ.रामकृष्णदासजी महाराज लहवितकर लिखित जगद्गुरु तुकाराम महाराज ओळीचा सार्थ अभंग गाथा ग्रंथ प्रकाशन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेवराव जानकर यांच्या शुभहस्ते (दि.02) करण्यात आले.हा सोहळा आमदार डॉ.सुधीर तांबे  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी वारकरी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक संत,महंत तसेच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नामदार जानकर व आ.डॉ.सुधीर तांबे यांनी डाॅ.लहवितकर महाराज यांचा गौरव करून त्यांच्या वारकरी संप्रदायाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष संजय महाराज धोंगडे,महामंडलेश्वर देवबाप्पा,महंत भैरवानंद महाराज आदि मान्यवरांसह संगमनेर परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते.

Exit mobile version