दुचाकीची पादचाऱ्यास धडक; दोघेजण जखमी

0
87

नांदेड,दि.20 : भारवेगातील मोटारसायकलने पायी जाणाऱ्या इसमास धडक दिल्याची घटना 20 मार्च रोजी भोकर फाटा ते नांदेड मार्गावर घडली.यामध्ये दुचाकी स्वार व पादचारी हे दोघेही गंभीर जखमी झाले,तर दुसऱ्या अपघातात वृत्तपत्र पुरवठा करणारी व्हॅन एका ट्रकवर पाठीमागून धडकल्याने एकजण जखमी झाला.बामणी येथील मोटारसायकल चालक सुधाकर गाडगे हे त्यांची मोटारसायकल क्र. एम.एच.26 ए. बी.7347 वर भोकर फाटा ते नांदेड मार्गावर जात असताना सदर दुचाकीने पायीं जात असलेले साहेबराव मेंटकर (45) यांना धडक दिली.या अपघातात दुचाकी अपघातानंतर घसरून पडल्याने दुचाकीस्वार व पादचारी हे दोघेही गंभीर जखमी झाले.महामार्ग पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या घटनेत वृत्त पत्राचे पार्सल घेऊन जाणारी व्हॅन एका ट्रकवर पाठीमागून धडकली.यामध्ये व्हॅन चालक गंभीर जखमी झाला.