
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान टेकऑफनंतर अवघ्या काही सेकंदांतच भीषण अपघातग्रस्त झाले. लंडनकडे २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्सना घेऊन निघालेले हे विमान उड्डाणानंतर काही वेळातच जमिनीवर कोसळले, ज्यामुळे मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल (Sumit Sabharwal) आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली होते. या अपघातात अनुभवी पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या ८२०० तासांचा अनुभवही तोकडा पडल्याचे दिसून येत आहे.
कॅप्टन सुमित सभरवाल हे एलटीसीचे ८२०० तासांचा अनुभव असलेले विमानचालक आहेत, तर सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर यांना ११००० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव होता. (Sumit Sabharwal)
कॅप्टन सुमित सभरवाल हे एअर इंडियाचे अत्यंत अनुभवी आणि प्रशिक्षित पायलट आहेत. त्यांच्या नावे हजारो तासांचा फ्लाइट अनुभव आहे. AI171 या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे नेतृत्व त्यांच्या हाती होते. या घटनेच्या क्षणी, विमान टेकऑफ करत असताना अचानक तांत्रिक बिघाड आणि अडथळ्यांमुळे परिस्थिती हाताबाहेर जात होती.
या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोठी बातमी म्हणजे, या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी सुद्धा प्रवास करत होते.