Home राष्ट्रीय देश वीजेचे बिल तब्बल 2,032 कोटी रुपये!

वीजेचे बिल तब्बल 2,032 कोटी रुपये!

0

मुरादाबाद (वृत्तसंस्था)- पीठाची गिरणी चालविणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल दोन हजार 32 कोटी रुपयांचे वीजेचे बिल मिळाले आहे. 

पराग मित्तल हे शहरातील काटघर परिसरात पीठाची गिरणी चालवतात. त्यांना दोन हजार 32 कोटी रुपयांचे विजेचे बील मिळाले आहे. या प्रकारामुळे बसलेल्या धक्‍क्‍यातून सावरून याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार करण्यास गेल्यानंतर तेथे कोणीच आपले ऐकून घ्यायला तयार नसल्याचे पराग यांनी सांगितले. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी ऑनलाईन बिल तयार करताना ही तांत्रिक चूक झाली असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version