Home राष्ट्रीय देश युवक बिरादरी द्वारे आगरा येथे राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

युवक बिरादरी द्वारे आगरा येथे राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

0

मुंबई:राष्ट्रीय स्तरावर सामाजिक जबाबदारीचे संस्कार, व्यक्तिमत्व विकास व नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी युवक बिरादरी (भारत) द्वारे ग्रैंड हॉटेल आग्रा येथे देशाच्या विविध भागातील 100 युवकांची कार्यशाळा संपन्न होत आहे.

राष्ट्रीय स्तरावर पर कार्यरत युवक बिरादरी संस्थेचा आग्रा शहराशी चार दशकांचा सांस्कृतिक संबंध आहे. युवक बिरादरीने देशातील युवकांसाठी “ताज मीट” या चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. आग्रा महापालिकेचे आयुक्त निखील फुंडे या कार्यशाळेचे उद्घाटन करणार असून एका प्रमुख राज्याचे निवृत्त मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेश कुमार त्यागी, आयटी क्षेत्रातील तज्ञ अपूर्व मंकड, युवक बिरादरीच्या संचालक विश्वस्त तथा मुंबईस्थित वेलिंगकर इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापक स्वर क्रांती, वनराईचे रविंद्र धारिया, धवल फडके, मेधा दिवेकर, बी. पी. टी. मुंबईचे अधिकारी निहार देवरुखकर, ज्येष्ठ पत्रकार पंकज इंगोले, रंगकर्मी नागेंद्र राय आदी मान्यवर चार दिवसांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. उत्तर प्रदेश बिरादरीचे संस्थापक अध्यक्ष अरुण डंग या कार्यशाळेचे स्वागताध्यक्ष आहेत. या कार्यशाळेत उत्तरप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकसह देशाच्या विविध भागामधून युवक सहभागी होणार आहेत.

गेली चाळीस वर्षे युवक बिरादरीचे कार्य हे आग्रा आणि उत्तर प्रदेशात सुरू आहे. यापूर्वी युवक बिरादरी द्वारे आयोजित ‘एक सूर एक ताल’ या कार्यक्रमात तत्कालिन मुख्यमंत्री अखिलेश यादव, दुर्गाशंकर मिश्रा, जगतसिंग फौजदार, अरुण डंग यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर आणि रंगकर्मी देखील आग्रा येथे सहभागी झाले होते.

हिरवे अंगनच्या माध्यमातून हिरवळ वाढीसाठी आणि समाजहीतासाठी कार्य, युवकांच्या विकासासाठी कार्य, त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहनासह वेगवेगळ्या क्षेत्रात युवकांनी मोठी उंची प्राप्त करावी, घरपणातील नायिका ज्या तंटामुक्त, व्यसनमुक्त आदर्श घर निर्माण करतात त्यांचा गौरव करून एक प्रेरणा समाजमनाला देणे हे बिरादरीचे उद्दिष्ट आहे. अभिरुप युवा संसद, युवाभूषण, युवानेतृत्व स्नेह छावणी, हिरवे अंगन अशी अनेक उपक्रम त्यासाठी बिरादरीत घेत असते. आणि याच संदर्भात आयोजित या कार्यशाळेचे नेतृत्व निमंत्रक डॉ. स्वप्नील यादव व प्रशांत वाघाये करतील. कार्यशाळेच्या सुरुवातीलाच ‘एक सूर एक ताल’ या कार्यक्रमाने शुभारंभ करण्यात येणार आहे.

Exit mobile version