
जम्मू काश्मीरमधील अमरनाथ येथे शुक्रवारी झालेल्या ढगफुटीत 15 भाविकांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे 40 जण बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु आहे.घटनास्थळी आयटीबीपीचे आणि एनडीआरएफची पथके पोहचली आहेत. रात्रभर तेथे बचाव कार्य सुरु होते. शनिवारची सकाळ होताच हे बचावकार्य वेगाने सुरु झाले आहे.
👉👉ढगफुटी झाल्यानंतर जो जलप्रलय झाला त्यामुळे येथे असलेले तंबू वाहून गेले. यामध्ये 15 भाविकांचा मृत्यू झाला तर 40 जण अद्यापही बेपत्ता आहेत.त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीती वर्तविण्यात येत आहे.
👉आयटीबीपीने दिलेल्या माहितीनुसार सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. येथे अद्यापही पाऊस पडत आहे. सध्या अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. जे भाविक त्या भागात नाहीत त्यांना देखील तेथे जाण्यापासून रोखले आहे. अमरनाथ गुफा जेथे आहे त्याच्याजवळ ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये जे लोक जखमी झाले आहेत त्यांना एअरलिफ्ट केले जात आहे.सोनमर्ग येथील बेस कॅंम्पवरुन लोकांना परत पाठविले जात आहे. वातावरण खराब असल्याने ढगफुटीसारखी घटना पुन्हा होऊ शकते त्यामुळे परत पाठविण्यात आल्याचे एका भाविकाने सांगितले.
👉👉लष्कराचे हेलिकॅप्टर आणले असून तेथे जखमी भाविकांना एअरलिफ्ट करुन उपचारांसाठी पाठविले जात आहे. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या ढगफुटीमुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर 40 जण अद्यापही बेपत्ता आहेत.आयटीबीपी आणि एनडीआरएफची पथके युध्द पातळीवर बचाव आणि मदत करीत आहेत.