Home राष्ट्रीय देश पीएफवर कर लावण्याचा निर्णय रद्द

पीएफवर कर लावण्याचा निर्णय रद्द

0

नवी दिल्ली, दि. १ – सरकारने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढताना ठराविक रक्कमेवर कर आकारणी लावण्याचा आपला निर्णय मागे घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयावर लोकांनी दर्शवलेल्या नाराजीमुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. ४० टक्यांहून जास्त भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढणा-यांवर कर लागू करण्याचा हा प्रस्ताव होता.

महसूल अधिकारी हसमुख अधिया यांनी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढताना कोणताही कर लागणार नसल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम कर कक्षेत आणण्याचे प्रस्तावित केले होते.

Exit mobile version