Home राष्ट्रीय देश रस्ते अपघातांवर अंकुश ठेवण्यासाठी थ्रीडी स्पीड ब्रेकर

रस्ते अपघातांवर अंकुश ठेवण्यासाठी थ्रीडी स्पीड ब्रेकर

0
नवी दिल्ली, दि. २७ – देशातील रस्ते अपघात टाळण्यासाठी विविध ठिकाणच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर थ्रीडी पेंन्टीग्जच्या माध्यमातून व्हर्च्युअल स्पीड ब्रेकर बनविण्यावर केंद्र सरकार विचार करत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांवर अंकुश ठेवण्यासाठी थ्रीडी पेंन्टीग्जची कल्पना मांडली  असून त्यांनी आपल्या ट्विटरवर, आम्ही पेंन्टीग्जच्या माध्यमातून व्हर्च्युअल स्पीड ब्रेकर बनविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे अनावश्यक स्पीड ब्रेकर बनविण्याची गरज राहणार नाही.
दरम्यान, नितीन गडकरी यांनी केलेले ट्विट सर्वत्र व्हायरल झाले आणि अनेक जणांनी या निर्णायचे स्वागत केले, तर अनेकांनी विरोध दर्शविला आहे.

Exit mobile version