Home राष्ट्रीय देश केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या स्वीय सहाय्यकपदी देवयानी खोब्रागडेंची नियुक्ती

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या स्वीय सहाय्यकपदी देवयानी खोब्रागडेंची नियुक्ती

0

नवी दिल्ली – केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून आयएफएस अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांची नियुक्ती झाली आहे.
रामदास आठवले हे महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत तर खोब्रागडे या देखील महाराष्ट्रीयन आहेत. परराष्ट्र सेवेत उच्चायुक्त राहिलेल्या देवयानी खोब्रागडे यांना 2013 मध्ये अमेरिकेतील नोकरीदरम्यान नोकराच्या आर्थिक शोषण प्रकरणात अटक झाली होती. त्यांच्या अटकेचा तत्कालिन काँग्रेस प्रणित यूपीए सरकार आणि विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षा यांनीही विरोध केला होता.

खोब्रागडे यांना झालेल्या अटकेचा भारत-अमेरिका संबंधावरही परिणाम झाला होता. तेव्हा रामदास आठवलेंसह त्यांच्या पक्षाने रस्त्यावर उतरुन त्यांच्या अटकेचा निषेध केला होता.

Exit mobile version