Home राष्ट्रीय देश दयाशंकरसिंह यांना न्यायालयीन कोठडी

दयाशंकरसिंह यांना न्यायालयीन कोठडी

0

लखनौ (वृत्तसंस्था) – बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी करणारे उत्तर प्रदेशमधील भाजपचे माजी नेते दयाशंकरसिंह यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.

दयाशंकरसिंह यांना शुक्रवारी बिहारमधील बक्‍सर येथे पोलिसांनी अटक केली होती. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्यांना अटक केली. मायावती यांच्यावर टिपण्णी केल्यानंतर भाजपनेही त्यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. यानंतर ते बक्‍सर येथे राहत होते.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने दयाशंकर यांना जामीन देण्यास नकार दिल्यानंतर अटकेसाठी दोन्ही राज्यांच्या पोलिसांवर दबाव वाढला होता. अखेर त्यांना अटक करत त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. दयाशंकरसिंह यांनी बसप अध्यक्षा मायावती यांची तुलना वारांगनेशी केली होती.

Exit mobile version