
वृत्तसंस्था
नवी दिल्ली- अफगणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करझाई यांच्या पत्नीने एका कन्येला शहरातील येथील रुग्णालयात जन्म दिला. अठ्ठावन्न वर्षीय करझाई यांचे हे चौथे अपत्य आहे.
भारतामधील अफगणिस्तानचे राजदूत शाइदा मुहम्मद अब् दाली यांनी सांगितले की, ‘अफगणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करझाई हे चौथ्यांदा भारतात पिता बनले आहे. त्यांच्या पहिल्या तिन्ही मुलांचा जन्म येथील अपोलो रुग्णालयात झाला आहे. चौथ्या कन्येचा जन्म शनिवारी (ता. 3) सकाळी अकरा वाजता अपोलो रुग्णालयात झाला. पत्नी व कन्येला भेटण्यासाठी काही वेळ ते रुग्णालयात आले होते. यानंतर ते लंडनला रवाना झाले.‘