Home राष्ट्रीय देश विनाअनुदानित सिलिंडर 86 रुपयांनी महागले

विनाअनुदानित सिलिंडर 86 रुपयांनी महागले

0

नवी दिल्ली: खुल्या बाजारात स्वयंपाकाचे सिलिंडर 86 रुपयांनी महागले आहे. जागतिक स्तरावर “एलपीजी’चे दर वाढल्यामुळे सिलिंडरचेही दर वाढवावे लागत असल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, सिलिंडरच्या अनुदानित किमतींवर या दरवाढीचा परिणाम होणार नसल्याचाही निर्वाळा सरकारने दिला आहे.
अनुदानित सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारे या दरवाढीची झळ बसणार नाही. दिल्लीमध्ये ही सवलत घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक मार्चनंतर नव्या सिलिंडरचे दर 737 रुपये असतील. त्यांच्या बॅंक खात्यामध्ये 303 रुपये अंशदानाची रक्कम जमा केली जाईल. ग्राहकांना केवळ 434 रुपयेच द्यावे लागतील, असे केंद्रीय पेटोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version