Home राष्ट्रीय देश १९८४च्या दंगलप्रकरणाचा पुन्हा तपास होण्याची शक्यता

१९८४च्या दंगलप्रकरणाचा पुन्हा तपास होण्याची शक्यता

0

पीटीआय, नवी दिल्ली
शासनाने नियुक्त केलेल्या समितीने दिल्लीती१९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीचा पुन्हा तपास करण्याची शिफारस केली आहे.
१९८४च्या दंगलीप्रकऱणात पुर्नतपासाची आवश्यकता आहे या पडताळणीसाठी गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जी.पी. माथूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना केली होती. या समितीने गेल्यात आठवड्यात दंगलीसंबंधीचा अहवाल गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवल्याचे कळते. या दंगलप्रकरणाचा एसआयटीकडून पुन्हा तपास करण्यात यावा अशी समितीने शिफारस केली आहे.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात शीखविरोधी मोठी दंगल उसळली होती. यामध्ये सुमारे तीन हजार ३३२५ लोक मारले गेले होते. दिल्लीत सर्वाधिक दोन हजार २७३३ लोक मृत्यूमुखी पडले होते.

Exit mobile version