Home राष्ट्रीय देश मुख्यमंत्री वीरभद्र यांची कन्या आणि कॅप्टन अमरिंदरांच्या नातूचा अाज विवाह

मुख्यमंत्री वीरभद्र यांची कन्या आणि कॅप्टन अमरिंदरांच्या नातूचा अाज विवाह

0

वृत्तसंस्था
नवी दिल्ली- लालूप्रसाद यादव आणि मुलायमसिंह यादव यांच्यात नातेसंबंध जुळल्यानंतर दिल्लीत आज (शनिवारी) आणखी एक शाही विवाह होत आहे. दिल्लीत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची कन्या अपराजिता कुमारी आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे नातू अंगद सिंह विवाहबद्ध होतील.अनेक दिग्गज देतील उपस्थिती…
दिल्लीतील 22, अकबर रोडवरील बंगल्यात हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अंसारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते शाही विवाह सोहळ्याला उपस्थित राहाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार घूमल यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच देशातील अनेक शाही परिवारांच्या सदस्यांना देखील निमंत्रित करण्‍यात आले आहे.
व्हीव्हीआयपींसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. बंगल्यात कोणालाही विना परवानगी प्रवेश दिला जाणार नाही.

व्हेज- नॉन व्हेज व्यंजने…
शाही विवाहाच्या केटरिंगचे काम ‘किचन आर्ट’कडे सोपवण्यात आले आहे. विवाहाच्या प्रीतीभोजमध्ये व्हेजसह नॉन व्हेज, चायनीज आणि विविध लजीज व्यंजने राहाणार असल्याचे किचन आर्टच्या एका कर्मचारीने सांगितले आहे.

Exit mobile version