कमलनाथ यांच्या पत्रकार परिषेद गेलेल्या पत्रकाराला कोरोनाची लागण!

0
200

भोपाळ,दि.25 – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वतःला क्वारंटाइन करत असल्याची घोषणा बुधवारी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच भोपाळमध्ये एका मुलीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. तिचे वडील एक पत्रकार आहेत. त्यांनी कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली होती. ही पत्रकार परिषद 20 मार्च रोजी झाली होती तसेच यामध्ये इतर माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. याच पत्रकार परिषदेमध्ये कमलनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांना यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे.