कुथे,पंचबुद्धे,मिश्रा, अफसाना पठान, नेहा नायक सभापती,स्थायी समितीवर लोकेश यादव, घनश्याम पानतवने

0
567
गोंदिया,दि.16ः- गोंदिया नगरपरिषदेच्या सभापतीपदाकरीता न्यायालयाच्या निर्देशानुसार आज(दि.16) झालेल्या आॅनलाईन व्हीडओ काॅन्फरंस निवडणुकीत भाजप आघाडीने वर्चस्व स्थापन केले.सोबतच स्थायी समितीवरही भाजप आघाडीचेच वर्चस्व राहिले तर विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीने निवडणुकीवर बहिष्कार घातला. उपविभागीय अधिकारी अनिल खडतकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्या उपस्थितीत ही निवडणुक प्रकिया पार पडली.पाच नगरसेवकांनी सभापती पदाकरीता उमेदवारी अर्ज दाखल केले.त्यानंतर व्हीडीओ काॅन्फरंसच्या माध्यमातून नगरसेवकांचे मत मिळाल्यानंतर निकाल जाहिर करण्यात आला.यामध्ये बांधकाम सभापती पदावर राजकुमार कुथे,नियोजन सभापती पदी बंटी पंचबुध्दे,शिक्षण सभापती अफसाना पठाण,पाणी पुरवठा सभापती विवेक मिश्रा,महिला बालकल्याण सभापती पदावर नेहा नायक विजयी ठरल्या.तर स्थायी समिती सदस्यपदी लोकेश(कल्लू )यादव व घनश्याम पानतवने यांची निवड करण्यात आली.सदर निवडणुक रद्द करण्यासाठी विरोधी पक्षाच्यावतीने नागपूर खंडपीटात याचिका दाखल करण्यात आली असता न्यायालयाने ती याचिका फेटाळली.