
गोंदिया : वेंâद्र व राज्य सरकारने सार्वत्रिक निवडणुकापूर्वी विद्युत दर ३० टक्के कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकार पक्षाला आश्वासनाचा विसर पडला आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्यात यावे, या मागणीला घेवून आम आदमी पक्षातर्पेâ (ता.२०) शिवाजी चौकात घंटानाद आंदोलन करून निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारने निवडणुकीपूर्वी वीज दर ३० टक्के कमी करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनाची पुर्ती करण्यात आली नाही, असा आरोप आपतर्पेâ करण्यात आला. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात वाढीव विज बिल देण्यात आले आहे. ते बिल माफ करण्यात यावे, या मागणीला घेवून आम आदमी पार्टीचे नागपुर विभागीय कोषाध्यक्ष पुरुषोत्तम मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हा संयोजक उमेश दमाहे, नरेंद्र गजभिये, बाबुलाल कोसरकर, मिलन चौधरी, अरुण बनाटे, सुनील भोंगाडे, रवि भंडारकर, सचिन दहिकार, डिलान बघेले, संतोष खोब्रागडे, नेहल खोब्रागडे, कार्तिक रहांगडाले आदि सहभागी झाले होते. दरम्यान शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी पक्षाच्या निवडणूक वचननाम्याची होळी करून सरकारविरूध्द निदर्शने करण्यात आली.