
आमगाव –आमगाव नगरपरीषदचा न्यायालयीन प्रकरण आता नागरिकांच्या डोईजड झाले आहे. सलग सहा वर्षापासून विकास थाबला आहे .सदर प्रकरण तात्काळ हाताळून विकास कामे हाताळावे या मागणीला घेऊन आमगाव नगरपरिषद संघर्ष समिती चे मंत्र्यांना साकडे घातले . याबाबत नगरविकास मंत्रीनामदार शिंदे यांनी पाजीटिव्ह संकेत दिले.
आमगाव नगरपरिषद चा विषय न्यायालयात मागील सहा वर्षपासून प्रलंबित आहे. राज्य शासनाने सर्वोच्य न्यायालयात आमगाव नगरपरिषद व्हावी यासाठी धाव घेतली . परंतु न्यायालय प्रकरण लांबत असल्यामुळे स्थानिक पातळीवर विकास कामे थांबली आहेत.
आमगाव नगरपरिषद स्थापित व्हावी यासाठी नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, विकासासाठी पुढाकार घेऊन शासनाकडे सलग सहा वर्षे पाठपुरावा केला आहे. परंतु गटातटात हा प्रकरण लांबवण्यात येत आहे.
सदर नगरपरिषद चा प्रकरण न्यायालयात असल्यामुळे विकास कामे थांबून पडले आहे.सामान्यांसाठी घरकुल योजना,रस्ते विकास, पाणी पुरवठा, स्वच्छता,आरोग्य,रोजगार सर्व थांबून पडले आहे.शासनाच्या योजना बंद असल्यामुळे प्रशासक यांचे कार्यच नियोजन शून्य ठरले आहे. यामुळे नागरिक लोकप्रतिनिधीच्या अभावी विकासाला मुकले आहे.
सदर न्यायालयीन प्रकरण तात्काळ राज्यशासनाने निकाली काढावे या मागणीला घेउन आमगाव नगर परिषद संघर्ष समितीने मा. ना. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भवभूती महाविद्यालय आमगाव येथे दिनांक 13 जानेवारीला भेट घेऊन साकडे घातले.
समितीचे रवी श्रीसागर, यशवंत मानकर,प्रा.सुभाष आकरे,जगदीश शर्मा,अजय गहरवार,संजय बहेकार,उत्तम नंदेश्वर, ऍड. येशूलाल उपराडे, संतोष श्रीखंडे,अजय खेताण,मनोज सोमवंशी,राजेश मेश्राम,आनंद शर्मा,राजकुमार श्यामकुवर, उज्वल ठाकूर,मोहिनी निंबार्ते,अरुण बागडे,रघुनाथ भुते, नरेंद्र वाजपेयी, सुरेंद्र नायडू,मुकेश शिवहरे यांनी सविस्तर बाब मंत्री शिंदे यांना सांगितले यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक उत्तर दिले.यात त्यांनी शासन पुढाकार घेईल असे आश्वाशीत केले.