अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव आशीष दुआ यांनी घेतला जिल्हा काँग्रेस कमेटीचा आढावा

0
45

गोंदिया,दि.१५- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशीष दुआ यांनी 11 व 12 जानेवारी रोजी गोंदिया जिल्ह्यात येऊन पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या आढाव्यासाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात सभेचे आयोजन करण्यात आले होते. आशीष दुआ यांनी 11 जानेवारीला भंडारा येथे शासकीय शासकीय रुग्णालयात घडलेल्या दुःखद घटनेतील पीडित परिवाराला महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांचेसह भेटी दिल्या नंतर भंडाराहून तिरोडा येथे आगमन झाले. तिरोडा येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच 12 जानेवारीला गोंदिया येथे काँग्रेस भोला भवन येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या व गोंदिया शहर / तालुका कमिटीच्या कार्याचा आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सदर प्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान प्रदेश सचिव अमर वराडे, विनोद जैन, कार्यध्यक्ष रत्नदीप दहिवले, तालुका अध्यक्ष सूर्यप्रकाश भगत यांनी अशीष दुआ याचे स्वागत करून पक्ष कार्याची माहिती दिली. सभेचे संचालन एड. योगेश अग्रवाल यांनी केले.
सभेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव व गोंदिया जिल्ह्याचे प्रभारी डॉ. बबनराव तायवाडे, यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय स्तरावरील सचिव गोंदिया जिल्ह्यात आल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यां मध्ये उत्साह संचारल्याचे दिसून आले. सभेला गप्पू गुप्ता,पन्नालाल शहारे, विशाल शेंडे, परवेज बेगं, हरीश तुलसकर, कर्मराव चव्हाण, शैलेश जयसवाल, विजय बाहेकर, पृथ्वीपाल सिंह गुलाटी, बलजीत सिंग बग्गा, दीपक उके, चमनलाल बिसेन, अरुणभाऊ गजभिये, रमेश अंबुले, त्रिशरण शहारे, निकेश बाबा मिश्रा, ममता ताई पाऊलझगडे, प्रभाताई उपराडे, वारिस भगत, शैलेश बिसेन, डालेश नागदिवे,अभिषेक जैन, गोपालराव कापसे, विष्णुदयाल बिसेन, बाबा बागडे, नफीस सिद्दिकी, अविनाश बोरकर, सेवकराम सोयाम, अजय राहागडाले, अप्रीत भगत, सिद्धार्थ गणवीर, पवन नागदेवे, रवींद्र बिसेन, फणसलाल बिसेन, राजकुमार पटले उपस्थित होते.