लखनौ,(वृत्तसंस्था)- नेहमी विवादित वक्तव्य करण्यात नेहमी चर्चेत राहणारे भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी एक वक्तव्य केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारला एमआयएमचे सुप्रीमो खा.असदोद्दीन ओवेसी आजमगढला आले आहे. त्यांनी सांगितले ओवेसी बिहारनंतर पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश मध्ये सुध्दा मदत करतील. हि इश्वरची कृपा आहे ओवेसींना खुदा ताकत दे असा तंज त्यांनी कसला. यामुळे भारतीय राजकारणात तर्क वितर्कांना उधाण आले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने पाच जागेवर विजय मिळवला होता. या पक्षाचा विस्तार जोमाने सुरु आहे. बिहारमध्ये मुस्लिम मतांचे विभाजन करण्यात एमआयएमला(ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादूल मुस्लिमिन) यश मिळाले होते. विरोधी पक्षांनी आरोप केला होता एमआयएम पक्ष भाजपाची बी टिम आहे. बिहारमध्ये पाच आमदार निवडून आल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रीय लोकदल सहीत विरोधी पक्षांनी मुस्लिम मतांचे विभाजन करुन भाजपाला फायदा केल्याचा आरोप केला होता. बंगाल व गुजरातमध्ये एमआयएम पक्षाने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. यावर्षी बंगालमध्ये विधानसभा निवडणुक होणार आहे म्हणून एमआयएमची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.