गोंदिया/भंडारा,दि.१६ः- येत्या गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशकडून निवडणुक प्रभारी व प्रमुख जाहिर करण्यात आले.यामध्ये भंडारा गोदिंया जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रभारी म्हणून आमदार डाॅ.परिणय फुके यांची निवड करण्यात आली.तर गोंदिया जिल्हा निवडणुक प्रमुख म्हणून तिरोड्याचे आमदार विजयभाऊ रंहागडाले तर भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नावाची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.सोबतच सहप्रभारी म्हणून माजी आमदार बाळा काशीवार व माजी आमदार रमेश कुथे यांचा समावेश करण्यात आला आहे.तर राजेश बांते यांची महाराष्ट्र प्रदेश ओबीसी आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.