अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी गोंदिया,चंद्रपूर व अमरावतीमध्ये काँग्रेसचे धरणे

0
54

चंद्रपूर/अमरावती/गोंदियाः- टीआरपीप्रकरणी आरोपी असलेल्या संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मागणीसाठी गोदिया,अमरावती व चंद्रपूर जिल्ह्यात आंदोलन करुन निवेदन सादर करण्यात आले.लोकसभा निवडणुकीआधी ४० जवान शहिद झाले. त्यानंतर भारताने पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राईक केला. पाकिस्तानवरील हल्ल्याबाबत उल्लेख तीन दिवस आधी संपादक अर्णब गोस्वामी यांच्या चॅटमध्ये आढळून आला आहे. टीआरपी घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये हे चॅट आहे. गोंदिया येथे शहिद भोला भवन परिसरात आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष एड.नामदेवराव किरसान,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष पी.जी.कटरे,प्रदेश सचिव अमर वराडे,विनोद जैन,अशोक(गप्पू)गुप्ता,जहीर अहमद,आशिष नागपूरे,योगेश अग्रवाल,एड.पी.सी.चव्हाण,चमनलाल बिसेन,बळेवाले बावणकर यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते.आंदोलनानंतर निवास उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांच्या मार्फेत निवेदन सादर करण्यात आले.

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात धरणे देण्यात आले. शुक्रवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता कमिटी कार्यालयासमोरील गिरनार चौकात आंदोलन झाले. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ अट करण्याच्या मागणीसाठी  धरणे देण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव नम्रताताई आचार्य-ठेमस्कर, महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष अश्विनीताई खोब्रागडे, अनुताई दहेगावकर यांनीही आपल्या मनोगतातून अर्णब गोस्वामी यांचा निषेध नोंदवित अटक करण्याची मागणी केली. आंदोलनात महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहिलभाई शेख, माजी नगरसेवक संतोष लहामगे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, नगरसेवक नीलेश खोब्रागड़े, किसान सेलचे अध्यक्ष भालचंद्र दानव, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, माजी नगरसेवक प्रवीण पड़वेकर, माजी नगरसेवक राजू रेवल्लीवार, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, घुग्घुसचे माजी अध्यक्ष जावेद सिद्दीकी, नरेंद्र बोबडे, मोहन डोंगरे, कुणाल चहारे, रुचित दवे, राजेश अड्डूर, राहिल कादर, इरफ़ान शेख, संजय रत्नपारखी, कृणाल रामटेके, सुनीता धोटे, सुरेखा चिड़े, एकता गुरले, बापू अंसारी, सूरज कन्नूर, काशिफ अली, केतन दुर्सेलवार, केशव रामटेके, राजेशसिंग चव्हाण, राजेश वर्मा, वैभव येरगुड़े, मोनू रामटेके, आशीष उराडे, निहाल शेख, नीतेश राहुरकडे, पप्पू सिद्दीकी, धरमु तिवारी, रितु दुर्गे, राकेश पिंपळकर, महेश पुजारी, रवी रेड्डी, विजय धोबे, अजय बल्की, शीतल काटकर, पवन नगरकार, गौतम चिकाले, चिन्ना डोंगे, मुन्ना चौधरी, उत्तम ठाकरे, जावेद सिद्दीकी, अशपाक शेख, सोहिल राजा, सुलतान अली, आकाश तिवारी, परवीन शेख सय्यद, प्रिया चंदेल, नल्लेश्वर पाझनकर यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अमरावती जिल्हा काँग्रेसच्यावतीने निवेदन