गोंदिया,दि.26 – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळया कृषी कायद्या विरोधात सदर कायदे केन्द्रसरकारने मागे घ्यावे यासाठी देशातील शेतकरी दिल्लीच्या सिमेवर मागील १२० दिवसापासून ठाण मांडुन बसले आहेत.या आंदोलन काळात ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत.त्या शेतकरी आंदोलनाला पाठिबां देण्यासाठी व शेतकरी संघटनानी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्यावतीने आज राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले.त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात गोंदियात आणि सर्व तालुका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन शेतकरी कायदा रद्द करण्यासंबधीच्या मागणीचे निवेदन प्रधानमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी मार्फेत पाठवण्यात आले.
सदर शेतकरी कायदा रद्द करण्यासाठी महाराष्ट्रातून ६० लाख शेतकऱ्यांच्या सहयांचे निवेदन राष्ट्रपतींना देऊन कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे.त्यात गोंदिया जिल्हयातून १ लाख २० हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्याचा समावेश आहे.तर दुसरीकडे पेट्रोल , डिझेल , स्वयंपाकाच्यागॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केन्द्र सरकार दिवसाढवळया लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलेडंर रिफिल 880 रुपयांवर आल्याने लोकांचे जगणे कठीण झाले आहे.कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागणार आहे.गोरगरीब जनता व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे. मात्र हिटलरशाही वृतीचे मोदी सरकार या बाबीवर एकही शब्द बोलायला तयार नाही. म्हणून तीन काळे कृषी कायदे तसेच महागाईच्या मुद्यावंर केन्द्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंद पाळला.या भारत बंदला काँग्रेस पक्षाचा सक्रिय पांठीबा राहिला असून जिल्हाध्यक्ष डॉ . नामदेव किरसान यांचे नेतृत्वात गोंदिया येथे गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी व सर्व तालुका ब्लॉक काँग्रेस कमिटयांचे वतीने आज २६ मार्चला एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
गोंदिया येथील आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. एन.डी.किरसान , प्रदेश सचिव डॉ. योगेन्द्र भगत ,विनोद जैन, अमर वराडे , काँग्रेस नेते अशोक ( गप्पु ) गुप्ता,तालुका अध्यक्ष सुर्यप्रकाश भगत,किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष जितेश राणे , युवक काँग्रेस अध्यक्ष अलोक मोहंती, जितेन्द्र कटरे, शैलेश जायस्वाल प्रशांत लिल्हारे , रणजित गणविर,प्रशांत लिल्हारे,पप्पु पटले,चैनलाल रणगिरे,अरुण गजभिये,गंगाराम बावनकर,ब्रिजालाल पटले,रामुजी चिखलोंडे ,आंनद लांजेवार,दिलीप गौतम,नरेश लिल्हारे,ममताताई झगडे,अनिताताई मुनेश्वर,विश्वेश्रर लिल्हारे,दलेश नागदेवे, मनिष चौव्हान,रमेश लिल्हारे,लखन नाईक,कृष्णा विवट,नफेस सिध्दकी,विनोद बरोंन्डे,अहमद सैय्यद,अभिषेक जैन, नियाज शेख,अफसर खान,बलजिंत बग्गा,अमर राहूल सहभागी झाले होते.
गोरेगाव येथील आंदोलनात तालुका काँग्रेस अध्यक्ष डेमेंद्र रहागंडाले,माजी सभापती पी.जी.कटरे,खरेदी विक्रीचे सभापती डाॅ.झामसिंह बघेले,विशाल शेंडे,माजी तालुकाध्यक्ष पी.सी.चव्हाण,खिरचंद येळे,शशी भगत,राहुल कटरे,मदन कोटांगले,महाप्रकाश बिजेवार,के.टी.वट्टी,महेश राऊत,बाबुलाल मेश्राम,लखन बारेवार,मनोज वालदे,निरज धमगाये,नामदेव नाईक,जयतुरा चव्हाण,चंद्रशेखर बोपचे,रमेश शिलेवार यांच्यासह मोठ्यासंख्येने काँगेस पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
सालेकसा येथे संजय देशमुख,मनोज गजभिये, वंदना राजू काळे,विमल बबलू कटरे,राजू काळे,वासुदेव चुटे,ओमप्रकाश लिल्हारे,महेंद्र शहारे,घनश्याम नागपूरे,ममता पटले,लता दोनोडे,सुमन ठाकरे,नरेश कावरे,कुसुम काळे,आक्राेष पठाण,तिरोडा येथे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले,तिरोडा शहर अध्यक्ष ठानेंद्रसिंह चव्हाण,गिरधर बिसेन आदी सहभागी झाले होते.