श्रीरामपुर-केंद्र सरकारने विना चर्चेने मंजूर केलेल्या तीन शेतकरी व कामगार विरोधी काळ्या कायद्याच्या निषेधार्थ तसेच दिल्ली सीमेवर असलेल्या शेतकऱ्यांनी पुरविलेल्या भारत बंदला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी नामदार थोरात यांनी श्रीरामपुरात लाक्षणिक उपोषण केले.यानंतर मुरकुटे यांच्या निवासस्थानी फलाहारासाठी ते गेले. यावेळी आमदार लहू कानडे, बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, ज्ञानदेव वाफारे उपस्थित होते. मुरकुटे आणि नामदार थोरात यांना आपली जीम दाखविताना आमदार कानडे यांनी मुरकुटे यांना काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले.आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बाळासाहेब ही आमच्या समवेत येणार होते. तसा त्यांनी आपल्याला शब्द दिला होता. मात्र, त्यांनी फसविले. ते काँग्रेसमध्येच राहिले.
मी राष्ट्रवादीत आलो असतो. पण वडिल भाऊसाहेब थोरात यांनी विरोध दर्शविला. त्यांच्या विरोधामुळे आपल्याला काँग्रेसमध्येच थांबावे लागले.यासंदर्भात युवानेते सिद्धार्थ मुरकुटे त्यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.