
गोंदिया/अर्जुनी मोरगाव- हिंदू धर्मीयांचा पवित्र सण होळी.या पवित्र होळीमध्ये आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी चप्पलेची माळ घातली.या दुष्कृत्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याने गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे,महिला आघाडी संघटिका डाॅ.प्रिती देशमुख,जिल्हा संघटक सुनील लांजेवार,उपजिला संघटक गंजेश डोहरे, शहर प्रमुख गुड्डू ऊके, राजू नागरिकर यांनी गोंदिया शहर पोलीस निरिक्षक बनसोडे यांना निवेदन दिले तर केशोरी येथील शिवसैनिकांनी राणादांपत्या विरोधात तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.होळी हा सण हिंदू धर्मियांचा पवित्र सण आहे.वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा,कु विचार सोडून समाजोपयोगी विचारांचा अंगीकार करावा या हेतूने होलिका दहन करण्याची प्राचीन परंपरा आहे.मात्र या प्राचीन परंपरेला अपवित्र करण्याचा घोर पाप अमरावतीचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी मेळघाटमध्ये होलिका दहन वेळी होळीला चपलांची माळ घातली.या दुष्कृत्यांचा तीव्र निषेधार्त शिवसेना शाखा केशोरी च्या वतीने विभाग प्रमुख चेतन दहीकर यांच्या नेतृत्वात राणा दांपत्य विरोधात केशोरी पोलीस ठाण्यात तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी थानेदार संदीप इंगळे यांना करण्यात आली.यावेळी अभिजित मसिद,नरेश बोरकर, लिलाधर ठाकरे,सुशिल गहाणे, नामदेव कापगते,कैलास चुंने उपस्थित होते.