राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त रुग्णांना फळवाटव व वृक्षारोपण

0
25

देसाईगंज दि.१०- युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देसाईगंज शहराच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते  हातानं पत्र पेटी मध्ये पत्र पाठविण्यात आले.
यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त आज युवक शहर देसाईगंज वडसा यांच्या वतीने वृक्षारोपणाचा व मास्क वाटपाचा कार्यक्रम गुजरी वार्ड येथे युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी देसाईगंज/वडसाच्या वतीने घेण्यात आला. त्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा सरचिटणीस श्यामजी घाईत, जिल्हा संघटकसचिव मनोज ढोरे,विधानसभा संघटन क्षेत्र सचिव मिलिंद सपाटे, युवक शहर अध्यक्ष दीपक नागदेवे, युवक शहर कोषाध्यक्ष भारत दहलानी. शैलेश पोटूवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ते फारुक पटेल ,साबू पठाण, असलम पठाण,विजू नागदेवे,अतुल रामटेके आणि सर्व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 22 वर्धापन दिना निमित्त रुग्णांना फळ वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आरमोरी विधानसभा क्षेत्र संघटक सचिव मिलींद सपाटे यांच्या नेतृत्वात देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख आनंद चावला, राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे शहर अध्यक्ष दिपक नागदेवे, कोषाध्यक्ष भरत दयलनी,वार्ड प्रमुख सुशिल केशवाणी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. अविनाश मिसार,वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणय कोसे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते,आरोग्य कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.