Home Top News उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकरांना मोठा धक्का, बंगला तोडण्याचं काम सुरु!

उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकरांना मोठा धक्का, बंगला तोडण्याचं काम सुरु!

0

मुंबई | केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण खात्याने सीआरझेड अर्थात किनारा नियमन क्षेत्र अधिसुचना 2018 कायदा जारी केला आहे. त्याच कायद्याचा आधार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिंलिद नार्वेंकर यांचा मुरूड येथील बंगला तोडण्याचं काम चालू आहे. मिलिंद नार्वेंकर यांच्यावर सीआरझेड नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणाबाबत भाजप नेते  किरीट सोमय्यांनी तक्रार दाखल केली होती.

मिलिंद नार्वेंकराचा हा बंगला दापोलीमधील मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावर आहे. हा बंगला ज्या ठिकाणी बांधला आहे. ती जागा सीआरझेडच्या नियमाचे अधिक्षेत्रात येते. अशी तक्रार किरीट सोमय्यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केली होती. या तक्रारीमध्ये अजून काही बंगल्यांचा समावेश आहे. मात्र थेट कार्यवाईची सुरूवात नार्वेंकरांच्या बंगल्यापासुन केली आहे.

मुरूड येथील बंगला पाडायला सुरूवात केल्यानंतर, “करून दाखविले, मिलिंद नार्वेंकराचा बंगलो तोडला. मुरूड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आता सुरू झाले. पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा. उद्या मी दापोलीला जावून तोडकामाची पाहणी करणार”, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. त्याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. त्याचबरोबर त्याने ट्विटमध्ये बंगला तोडला जात असल्याचा व्हिडीओ ही पोस्ट केला आहे.

दरम्यान, मिलिंद नार्वेकरांनी हा बंगला बांधण्यासाठी समुद्र किनाऱ्याजवळील सुमारे साडेचारशे झाडं कापली होती. तसेच त्या जागेची बाजारभावानुसार किंमत आज 10 कोटी इतकी आहे. त्यांना कदाचित पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं मार्गदर्शन असावं, असंही सोमय्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version