Home राजकीय गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक रविवारला

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक रविवारला

0

गोंदिया,दि.11ः-गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 12 सप्टेंबर रविवारला दुपारी 02.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन, गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे व माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रीकापुरे, जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर, महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर उपस्थित राहणार आहेत.सदर बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष संघटन, मजबुती व आगामी काळात येणाऱ्या निवडणुका इत्यादी बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे.सदर बैठकीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version