महाराष्ट्र बंद च्या समर्थनार्थ आरपीआय (आंबेडकर) पक्षाचे कल्याण येथे निदर्शने

0
28

कल्याण – महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा देऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने पक्षा च्या वतीने कल्याण येथील आंबेडकर उद्यान येथे निदर्शने करून शेतकऱ्यांचे आंदोलन चीरडणाऱ्या भाजपा सरकारच्या जाहीर निषेधाचे निवेदन कल्याण तहसीलदार यांना देण्यात आले

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद बेळमकर, डी बी एन संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद वानखेडे, डी बी एन ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज बेळमकर, आरपीआयचे कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते, जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर हिवाळे, उपाध्यक्ष अशोक लीहित्कर, किसन रोडे,सचिव प्रशांत बनसोडे कल्याण शहर अध्यक्ष संजय जाधव, जिल्हा सचिव ताराचंद सोनवणे, महिला ठाणे जिल्हा अध्यक्षा अनामिका महाले, कल्याण-डोंबिवली जिल्हा युवक अध्यक्ष सुमित माने, डी बी एन संघटना कल्याण-डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड, डोंबिवली पूर्व अध्यक्ष सुमित कनकुटे, डी बि एन संघटनेचे अलीभाई शेख आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते