भाजपच्या प्रचारपत्रकावर शिवसेना सहजिल्हाप्रमुखांच्या छायाचित्रांने राजकारणात खळबळ

0
216

गोंदिया,दि.12ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या उर्वरित जागासांठी येत्या 18 जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर धरु लागला आहे.त्यातच सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांसाठी कंबर कसलेली असताना व सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणुक रिंगणात असतांना भाजपच्यावतीने मात्र शिवसेनेचे जिल्हा सहसपंर्क प्रमुख मुकेश शिवहरे यांच्या छायाचित्राचा वापर आपल्या प्रचार साहित्यावर वापरण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.शिवसेनेचे सहजिल्हाप्रमुख मुकेश शिवहरेंच्या चेहर्याची गरज भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या ओबीसीगटातील सर्वसाधारण झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती जागासाठी पडल्याची चर्चा सुरु झाली आहे.दवनीवाडा मंडळाचे भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष पप्पू अटरे यांच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पत्रकामध्ये भाजप नेत्यासोबंतच शिवसेना सहजिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांचे छायाचित्र सुध्दा प्रकाशित करण्यात आले आहे.ते सुध्दा माजी आमदार खोमेश्वर रहागंडाले व भजनदास वैद्य यांच्या आधी व भाजपचे संघटनमंत्री विरेंद्र अंजनकर यांच्यानंतर त्यांचे छायाचित्र पत्रकावर प्रकाशित करण्यात आल्याने शिवहरेंची भाजपला या निवडणुकीत गरज भासली का अशी म्हणण्याची वेळ आली आहे.आज बुधवार (दि.12)रतनारा जिल्हा परिषद गटातील डोंगरगाव व रतनारा पंचायत समितीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते.त्या पत्रकावर शिवहरेंचे छायाचित्र वापरले गेल्याने शिवसेनेतही खळबळ माजली आहे.