
अर्जुनी / मोरगाव– तालुक्यातील किशोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा उमेदवारांच्या प्रचारार्थ हनुमान चौक ईळदा व ग्राम पंचायत सभागृह केशोरी येथेखासदार प्रफुल पटेल यांची सभा पार पडली. यावेळी खासदार प्रफुल पटेल म्हणाले कि, मागील दोन वर्षांपासून राज्यात आमची सरकार आहे. या काळात अनेक सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आमचा पक्ष ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या आधारावर काम करते आणि म्हणून शेतकरी, मजूर महिला, युवक यांच्या सबलीकरणाचे काम निरंतर चालू असते. तालुक्यात इटियाडोह तलावाचे पाणी परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पनात संजीवनी देण्याचे काम करते आहे यातून युवक, महिला सर्वाना रोजगार प्राप्त होते. दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाची आपत्ती ओढावली. संकट काळात विरोधक दिसून यायचे नाही. आता मात्र निवडणुकीच्या काळात जनतेला भूलथापा देण्यासाठी त्यांची गर्दी दिसते, आम्ही सातत्याने गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी पुढे राहिलो. लाकडाऊन काळात गरजूपर्यंत अन्नधान्य व मदत पोहोचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्त्याने केले. ऑक्सीजनचा तुटवडा असताना गोंदिया जिल्हात ऑक्सीजन प्लांट उभारण्यात आले आहे. रेमडेशिविरचा तुटवडा असताना गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना या बाबीची कमतरता होवू दिली नाही.खासदार प्रफुल पटेल सोबत सर्वश्री आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, योगेश नाकाडे, हिरा शेंडे, येशवंत परशुरामकर, रतिराम राणे, नामदेव डोंगरवार, सुशीला हलमारे, रेखाताई पालीवाल, धनीराम वड्डे, विकास रामटेके, नामदेव लांजेवार, रामलाल कुंभारे, देवा कोरेटी, जयंत रामटेके, नेताजी सुलाटे, हेमराज डोंगरे, बलराम बंगर, योगेश नाकाडे, हिरालाल शेंडे, यशवंत गणवीर, बाबुराव नाकाडे,सहित बहुसंख्येने कार्यकर्ता, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.