2015 जि.प.निवडणूक 2022 जि.प.निवडणूक निकाल पंचायत समिती जागा(106 जागा)
राष्ट्रवादी काँग्रेस – 20 8 13
काँग्रेस– 16 13 20
भाजप- 17 26 57
चाबी(आ.अग्रवाल संघटन) 04 10
अपक्ष(भाजप बंडखोर) 02 6
गोंदिया(खेमेंद्र कटरे)- गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ गट आणि पंचायत समितीच्या १०६ गणासाठी घेतलेल्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (ता. १९) जाहीर झाले.बेरार टाईम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार संभाव्य 53 जागावरील विजयी उमेदवार आणि पक्षीय बलाबल कसे राहील याचा अंदाज प्रकाशित केला होता,त्यानुसार जवळपास अंदाज खरा ठरला आहे. जिल्हा परिषदेची सत्ता पुर्ण बहुमताने मिळवण्यासाठी भाजपला 1 जागेची आवश्यकता असून ती 2 अपक्षांच्या माध्यमातून पुर्ण होणार आहे.53 पैकी 26 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.भाजप दुसर्यांदा बहुमताने सत्तेत येणार आहे.सत्तास्थापनेच्यावेळी गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल( 6 जागा) व तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले( 9 जागा) यांची महत्वाची भूमिका राहणार आहे.
मात्तबरांना निवडणुकीत पराभवाचा स्वाद देणारे व पहिल्यांदा निवडून आलेल्या सदस्यांना यावेळी भाजपच्यावतीने सत्तेत सहभागाची संधी दिली जाण्याची पुर्ण शक्यता वर्तविली जात आहे.सातत्याने विजयी होऊन आलेले सदस्य हे मार्गदर्शनाच्या भूमिकेत राहणार असून नवख्यांच्या हातात जिल्हा परिषदेची सत्ता राहणार आहे.तिरोडा व गोंदिया विधानसभा मतदारसंघातच अध्यक्षपदासाठी चुरस राहणार असली तरी तिरोडा विधानसभा मतदारसंघाला अध्यक्षपदाची संधी चालून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण या मतदारसंघातून भाजपने दोन मात्तबर उमेदवारांचा पराभव केलेला आहे.
गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी असल्याने आरक्षणाचा प्रश्न येथे निकाली निघाला आहे.भाजप मोठा पक्ष असल्याने भाजपकडे युवा नेतृत्वांने यावेळी विजय मिळविला आहे.त्यातच मात्तबरांना पराभूत करणारे जे उमेदवार आहेत,त्यामध्ये डव्वा जि.प.गटातून डाॅ.भुमेश्वर पटले,सोनी गटातून पंकज रहागंडाले,सेजगाव गटातून पवन पटले यांची नावे प्रामुख्याने येतात.या व्यतिरिक्त फूलचूर गटातून जिल्ह्यात सर्वाधिक मताने विजयी होणारे संजय टेंभरे,किकरीपार गटातून किशोर महारवाडे,मुंडीपार गटातून डाॅ.लक्ष्मण भगत या नावांचा विचार प्रामुख्याने अध्यक्ष/उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डात होण्याची शक्यता आहे.
मात्र राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांना मात्र मोठा धक्का बसला आहे.राष्ट्रवादीला फक्त 8 जागावर समाधान मानावे लागले,यात 12 जागांचा नुकसान यावेळी झाला आहे.मागील निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत जब्बर धक्का बसला असून तिसर्या क्रमांकावर गेला आहे.याठिकाणी राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज निर्माण झाली आहे,सोबतच गेल्या काहीवर्षापासून स्थानिक स्वराज्यसंस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि भूमिकेचाही फरक पडला.सोबतच यावेळी धानउत्पादकांना बोनसबद्दल स्पष्ट न सांगणे आणि गेल्यावर्षात उशीरा मिळालेले धानाचे चुकारे व बोनस हे कारण सुध्दा राष्ट्रवादीच्या विरोधात गेल्याचे दिसून येते.
गोंदियात गप्पू गुप्ता काँग्रेसचे हिरो..पण काँग्रेस झिरो
काँग्रेसला 13 जागावर समाधान मानावे लागले आहे.2015 च्यावेळी काँग्रेसचे दमदार नेतृत्व म्हणून माजी आमदार गोपालदास अग्रवाल होते यांच्या काळात काँगेसने 16 जागा जिंकल्या होत्या.मात्र यावेळी काँग्रेसकडे सर्वसामान्य नेत्यांची फळी होती.त्यातच काँग्रेसमध्ये आलेले नवीन कार्याध्यक्ष गप्पू गुप्ता हे गोंंदिया विधानसभा मतदारसंघातच नव्हे तालुक्यासाठी हिरो होते.परंतु जिल्हा परिषदच नव्हे तर पंचायत समितीचीही एकही जागा काँग्रेस न जिंकू शकल्याने गोंदियात गप्पू गुप्ता हिरो आणि काँग्रेस झिरो अशी चर्चा एैकायला मिळत होती.
राष्ट्रवादीतून आलेले माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या नेतृत्वात पाहिजे तेवढे समन्वय नसतांनाही काँग्रेसने 13 जागा जिंकल्या.यात गोंदिया,तिरोडा,सडक अर्जुनी तालुक्यात मात्र काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही.मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवारांना हरविण्यात काँग्रेसचे नेते आपपल्या तालुक्यात मोठ्याताकदीने सक्रिय राहिल्याने या तालुक्यात खाताही उघडता आले नाही,हे तेवढेच सत्य आहे.याचा लाभ मात्र भाजपच्या उमेदवारांना झाला.मतदानापुर्वी सुध्दा काही जागांवर सामंजस्य न दाखवू शकल्याने काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली आहे.
यावेळच्या निवडणुकीत गोंदिया विधानसभा मतदारसंघात अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या चाबी या नवनिर्मित पक्षाने 4 जागा जिंकल्या आहेत.तर भाजप बंडखोर एका जागेवर विजयी झालेला आहे.
या निवडणुकीत एकंदरीत भाजपने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवत पुर्ण बहुमताची वाट धरली.राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झालेला पराभव महत्वाचा ठरला आहे.
या निवडणुकीत विजयाची माळ आपल्याच गळ्यात पडेल, या आविर्भावात असलेल्या मातब्बर नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मतदारांनी बहुतेक नव्या चेहऱ्यांना संधी देत त्यांच्यासाठी मिनी मंत्रालयाची दारे खुली करून दिली. सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा जिल्हा परिषद क्षेत्रातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, तिरोडा तालुक्यातील सेजगाव जिल्हा परिषद क्षेत्रातून राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,गोरेगाव तालुक्यातील सोनी जिल्हा परिषद क्षेत्रातून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव व माजी जिल्हा परिषदेचे सभापती पी.जी. कटरे यांचा पराभव झालेला आहे.हे तिन्ही उमेदवार तिसर्यांदा सभागृहात पोचले असते.मात्र यांना नव्या चेहर्यांनी मात दिली.
शहारवाणी जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपचे माजी सभापती मोरेश्वर कटरे,सुकडी मतदारसंघातून माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले यांचा पराभव नवख्या उमेदवारांनी केला आहे.आमगाव तालुक्यातील गोरठा जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांचे पूत्र हरिहर मानकर यांना यावेळी सुध्दा पराभवाचा फटका बसला.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के आेबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने पहिल्या टप्प्यात म्हणजे, २१ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी तसेच पंचायत समितीच्या ८६ गणासाठी निवडणूक घेण्यात आली. दरम्यान, आेबीसींच्या जागा सर्वसाधारण करून निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्याने दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या १० जागा आणि पंचायत समितीच्या २० गणांसाठी मंगळवारी (ता. १८) निवडणूक घेण्यात आली. तथापि, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या निवडणुकीत मातब्बर नेत्यांना मतदारांनी पराभवाचे चटके दिले.
विशेष म्हणजे सालेकसा,गोरेगाव,देवरी या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही.तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या तिरोडा तालुक्यातही काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही.भारतीय जनता पक्षाला सालेकसा तालुक्यात विजय मिळवता आलेला नाही.
विशेष म्हणजे सालेकसा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत.यातही या 4 ही जागावर महिलांनी विजय मिळविलेला आहे.त्यामध्ये प्रदेश काँग्रेस ओबीसी आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष विमल बबलू कटरे,गोंदिया जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना राजू काळे यांनी पहिल्याच निवडणूकीत विजय मिळविला आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्या व माजी गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे व माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा मेंढे यांनी विजय मिळवला आहे.माजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम,माजी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी विजय मिळवला आहे.

आमदार कोरेटीनी 14 पैकी 9 जागावर मिळवले वर्चस्व
आमगाव -देवरी विधानसभा मतदारसंघात आमगाव,देवरी व सालेकसा तालुक्यांचा समावेश असून सालेकसा पंचायत समितीवर एकहाती सत्तास्थापन केली आहे.सोबतच जिल्हापरिषदेच्या 4 ही जागा जिंकल्या आहे.त्यानंतर देवरी तालुक्यात 3 व आमगाव तालुक्यात 2 अशा 14 पैकी 9 जागा जिंकून काँग्रेसची ताकद गेल्या काही वर्षाच्या तुलनेत अधिक वाढवली आहे.यावरुन आमदार सहसराम कोरेटे यांनी मतदारसंघात केलेल्या कामाची पावती आणि कार्यकर्त्यांसोबतची साथ या मतदारसंघात काँग्रेसला भविष्यात महत्वाची दिशा देणारी राहणार आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपपासून वेगळे होऊन गोंदिया मतदारसंघातून अपक्ष निवडणुक लढणारे गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया तालुक्यातील 14 जिल्हा परिषद व 28 पंचायत समिती जागेवर पुर्ण ताकदिने निवडणुक लढविली.त्याचा फटका भाजपसह राष्ट्रवादीलाही बसला.गोंदिया तालुक्यात भाजपच्या विजयाला चाबी संघटनेच्या उमेदवारांनी अडवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.तर राष्ट्रवादीला मात्र गेल्यावेळच्या तुलनेत 1 जागा गमवावी लागली आहे.चाबी संघटनेने 4 जागा जिंकून भाजपला पुर्ण बहुमतापासून रोखले.
जिल्हा परिषद गोंदिया विजयी उमेदवार 53
गोंदिया- 14 सीट(भाजपा – 6, राका – 3, अपक्ष (चाबी) – 4, अपक्ष -1)
1. बिरसोला- सर्वसाधारण (महिला) : नेहा तुरकर – राका
2. पांजरा- अनु. जमाती (महिला) : वैशाली पंधरे – अपक्ष (चाबी)
3. काटी- अनु. जमाती : अनंदा वाढीवा – अपक्ष (चाबी)
4. धापेवाड़ा- अनु. जमाती : विजय उईके – भाजपा
5. पांढराबोडी- अनु. जमाती (महिला) : शांताबाई देशभ्रतार – भाजपा
6. कामठा- अनु. जमाती : रितेश मलगाम – भाजपा
7. नागरा- सर्वसाधारण – रुपेश(सोनू)कुथे – अपक्ष (टोपली)
8. रत्नारा- सर्वसाधारण (महिला) – अंजली अटरे – भाजपा
9. एकोडी- सर्वसाधारण (महिला) : अश्विनी पटले- राका
10. पिंडकेपार- अनु. जाती (महिला) : दीपा चन्द्रिकापुरे – अपक्ष (चाबी)
11. कुड़वा- अनु. जमाती : पूजा सेठ – राका
12. आसोली- सर्वसाधारण (महिला) : लक्ष्मी तरोने – भाजपा
13. खमारी- अनु. जमाती (महिला) : ममता वाळवे – अपक्ष (चाबी)
14. फुलचुर- सर्वसाधारण : योपेंद्रसिंग(संजय) टेंभरे – भाजपा
——————————–
आमगांव- (5) (भाजपा – 2, काँग्रेस -2, राका – 1)
15. घाटटेमनी- सर्वसाधारण : सुरेश हर्षे – राका
16. किकरीपार : किशोर महारवाडे – भाजपा
17. गोरठा- सर्वसाधारण (महिला) : छबूताई उके – काँग्रेस
18. ठाणा- अनु. जमाती : हनुवट वट्टी – भाजपा
19. अंजोरा- सर्वसाधारण (महिला) – उषाताई मेंढे – काँग्रेस
———————————-
सालेकसा- (4) (काँग्रेस – 4)
20. झालिया- सर्वसाधारण (महिला) : छाया नागपुरे – काँग्रेस
21. पिपरिया- सर्वसाधारण (महिला) : गीता लिल्हारे – काँग्रेस
22. तिरखेड़ी- सर्वसाधारण(महिला) : विमल कटरे – काँग्रेस
23. कारूटोला- सर्वसाधारण (महिला): वंदना काळे – काँग्रेस
———————————–
गोरेगाव- (6) (भाजपा – 4, काँग्रेस – 2)
24. शहारवाणी- सर्वसाधारण : जितेंद्र कटरे – काँग्रेस
25. सोनी- सर्वसाधारण : पंकज रहांगडाले – भाजपा
26. घोटी- अनु. जमाती (महिला) : प्रीती कतलाम – भाजपा
27. कुऱ्हाडी – अनु. जाती : शैलेश नंदेश्वर – भाजपा
28. मुंडिपार- सर्वसाधारण : लक्ष्मण भगत – भाजपा
29. निम्बा- सर्वसाधारण : शशी भगत – काँग्रेस
————————————-
तिरोडा- ( 7)(भाजपा – 5, राकाँ – 2)
30. अर्जुनी- सर्वसाधारण : चतुर्भुज बिसेन – भाजपा
31. सेजगाव- सर्वसाधारण : पवन पटले – भाजपा
32. सुकड़ी- सर्वसाधारण : जगदीश बावनथडे – राका
33. ठाणेगाव- सर्वसाधारण (महिला) : माधुरी रहांगडाले – भाजपा
34. कवलेवाडा- सर्वसाधारण : किरण पारधी – राका
35. सरांडी- अनु. जमाती (महिला) : रजनी कुंभरे – भाजपा
36. वड़ेगाव- सर्वसाधारण (महिला) :तुमेश्वरी बघेले -भाजपा
———————————–——-
सड़क अर्जुनी- (5) ( भाजपा – 4, राकाँ – 1)
37. पांढरी- सर्वसाधारण (महिला) : सुधा रहांगडाले – राका
38. डव्वा- सर्वसाधारण : डॉ भुमेश्वर पटले – भाजपा
39. सौंदड़- अनु. जमाती (महिला) : निशा तोडासे – भाजपा
40. चिखली- सर्वसाधारण (महिला) :कविता रंगारी -भाजपा
41. शेन्डा- सर्वसाधारण (महिला) : चंद्रकला डोंगरवार – भाजपा
——————————————
देवरी- (5)(भाजपा – 2, काँग्रेस -3)
42. पुराड़ा- सर्वसाधारण (महिला): सविता पुराम – भाजपा
43. गोटाबोडी- अनु. जाती (महिला) कल्पना वालोदे – भाजपा
44. भर्रेगाव- सर्वसाधारण : संदीप भाटिया – काँग्रेस
45. ककोडी- अनु. जाती : उषाबाई शहारे – काँग्रेस
46. चिचगड- सर्वसाधारण (महिला) : राधिका धरमगुळे – काँग्रेस
——————————————-
अर्जुनी/मोरगाव- (7)(भाजपा -3, काँग्रेस -2, राकाँ -1, अपक्ष -1)
47. गोठनगाव- अनु. जाती : यशवंत गणवीर – राका
48. नवेगांवबांध- सर्वसाधारण (महिला) : रचनाताई गहाणे – भाजपा
49. बोंडगावदेवी- सर्वसाधारण : लायकराम भेंडारकर – भाजपा
50. माहुरकूड़ा- सर्वसाधारण(महिला) : सुनीता कापगते – काँग्रेस
51. ईटखेडा- सर्वसाधारण(महिला) : पौर्णिमा ढेंगे – अपक्ष
52. महागाव- सर्वसाधारण (महिला) : जयश्री देशमुख – भाजपा
53. केशोरी- सर्वसाधारण : श्रीकांत घाटबांधे – काँग्रेस