भाजपा महिला मोर्चा जिल्हा प्रभारीपदी सीताताई रहांगडाले

0
80
गोंदिया : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे यांनी भाजपा महिला मोर्चा गोंदिया जिल्हा प्रभारी म्हणून भाजपा महिला मोर्चा प्रदेश सदस्या सीताताई रहांगडाले यांची नियुक्ती केली आहे. उमाताई खापरे यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रात, सीता रहांगडाले यांच्यावर भाजपाचे संघटनात्मक कार्य अधिक भक्कम व मजबूत करण्याकरिता आघाडीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.  तसेच नव्या जबाबदारीच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.