राज्य सरकारला भाजप युवा मोर्चाचे निवेदन
देवरी – दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा डिझेल आणि पेट्रोल वरील सर्व कर तीन दिवसात कमी करुन दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा इतर तालुक्याबरोबरच देवरी तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने सुद्धा २५ मे बुधवारला स्थानिक तहसिलदार मार्फत राज्य सरकारला दिला आहे.
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव हे गगनाला भिडलेले असताना सुद्धा भारतातील सर्व सामान्य जनतेला महागाई पासून दिलासा देण्यासाठी ज्या प्रकारे केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्क मधून पेट्रोलवर आठ रुपये आणि डिझेलवर सहा रुपये कर कमी केला आहे. त्याचप्रकारे राज्य सरकारने सुद्धा सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी कर कमी करायला पाहिजे.
आजच्या घडकेला केंद्र सरकारचा कर हा १९ रुपये असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात कर कमी करु शकतंय. तर, महाराष्ट्र राज्य सरकार इतर राज्यांपेक्षा सर्वात जास्त ३० रुपये कर आकारत असताना सुद्धा फक्त २ रुपयेच कमी कसं काय केले ? महाराष्ट्र राज्य सरकार सोडून इतर राज्य सरकार वाटल्यास, फक्त १७ ते १८ रुपये कर आकारत असून तिथल्याही सरकारने सर्व सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे.
परंतू , सर्वात जास्त कर घेत असलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारने ३० रुपये कर घेऊन सुद्धा त्याप्रमाणात कर कमी न केल्यामुळे तीन दिवसांची मुदत देऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा इतर जिल्ह्या बरोबरच अखेर देवरी तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने सुद्धा २५ मे बुधवारला स्थानिक तहसीलदार मार्फत निवेदन देऊन महाराष्ट्र राज्य सरकारला इशारा दिला आहे.
यावेळी प्रामुख्याने भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शाहू , मार्गदर्शक महेंद्र मेश्राम, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष इंदरजीतसिंग भाटिया, महामंत्री योगेश ब्राह्मणकर, नितेश वालदे, मनेंद्र मोहबंशी, बाळकृष्ण गायधने, सुरेन्द्र खोटेले, नितेश झिंगरे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष माजीद खान, तालुकाध्यक्ष इमरान खान, विद्यार्थी मोर्चा तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने, उपाध्यक्ष दिपक शाहू, शंभू अग्रवाल, लिलाधर गुरुपंच आदी उपस्थित होते.