भंडारा -: वादाखिलाफी व शहादत दिनानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध भाकप व किसान सभेतर्फे 7 जूनला घरकुल ,अतिक्रमीत घरकुल धारकांना पट्टे,पाणीप्रश्न ,शेतकऱ्यांच्या संपूर्ण रब्बी धानाची खरेदी, निराधारांचे प्रलंबित अनुदान, पदवीधर अंशकालीन उमेदवारांची नियुक्ती इत्यादी 19 मागण्यांना घेऊन कलेक्टर कचेरी समोर निदर्शने व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.त्यात 30 आंदोलकांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व भाकपचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे समन्वयक कॉम्रेड हिवराज उके यांनी केले.
सर्वप्रथम गांधी चौक भंडारा येथे नगर परिषदेसमोर निदर्शने आंदोलन करून उप मुख्याधिकारी श्रीमती चव्हाण मॅडम यांना 631 अतिक्रमित घरकुल धारकांचे पट्ट्याच्या मागणीसाठी वैयक्तिक अर्ज सादर करण्यात आले. तसेच बेघरांना घर, पाणी पुरवठा योजनेची तात्काळ अंमलबजावणी , फोडलेल्या रस्त्याची दुरुस्ती, फुटपाथ दुकानदारांना गाडे, सागर तलावाचे सौंदर्यीकरण, स्मशानभूमीच्या रस्त्याची उंची इत्यादी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
त्यानंतर जिल्हाधिकारी माननीय संदीप कदम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मा.जिल्हाधिकारी यांनी व नगर परिषदेने लवकरात लवकर निवेदनातील मागण्यांवर योग्य कार्यवाही करावी व केलेल्या कारवाईची माहिती देण्यात यावी अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आवाहन काॅ.हिवराज उके यांनी केले.आंदोलनात काॅ. वामनराव चांदेवार ,वाल्मीक नागपुरे, जे.के. अंबूलेे , गणेश चिचामे, संतोष जोशी, रवींद्र लांजेवार ,प्रकाश दमाहे, प्रमोद किंदरले ,सिद्धार्थ गोस्वामी ,अर्चना रहाटे ,रमेश बनकर, सिद्धार्थ गोस्वामी, अतुल श्रीवास्तव, पुष्पलता गुल्लर, निर्मला बावने, प्रभा मेश्राम ,वर्षा बावणे, माया चव्हाण ,वंदना वाहने, रमेश पंधरे, महादेव बोरकर ,ज्ञानेश्वर साखरकर, ताराचंद देशमुख ,राजगुरू बावनथडे प्रकाश विके खुशाल साखरकर, महादेव आंबाघरे इत्यादींची उपस्थिती होती