मुंबई,दि.10ः-राज्यसभेसाठी मतदान प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर आता मतमोजणीला सुरूवात झाली आहे; पण भाजपनेही मतदान प्रक्रीयेवेळी तीन मतांवर आक्षेप घेतला होता. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने हा आक्षेप फेटाळला होता; पण या प्रक्रीयेचे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर तीन पानांचे सादरीकरण करण्यात आले. भाजपच्या आक्षेपाची केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे.
भाजपच्या आक्षेपाची दखल घेताच महाविकास आघाडीनेही रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. तुर्तास मतमोजणी तीन तासांपासून रखडलेली आहे. तर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना मुंबईतच थांबा, अशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून प्राप्त झाल्या आहेत.
निवडणूक आयोगाचा विचारविनिमय सूरू
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजप आणि महाविकास आघाडीने आक्षेप नोंदवले त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी एकत्रित बसले असून मतदान प्रक्रीयेवेळीचे फुटेजही अधिकारी तपासत आहेत. यावर विचारविनिमय सुरु असून आता काही वेळातच आक्षेपावर निर्णय निवडणूक आयोग देईल.
कोणत्याही नियमांचा भंग केला नाही- आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला असून त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, मी मतदानाची क्रिया केली त्यातून माझे मत बाद व्हावे असे म्हणणे चुकीचे आहे. कारण नसताना खेळ लांबवर घेऊन जाण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे. मी विवेकाने मतदान केले आहे. कुठेही मी मतपत्रिका दाखवली नाही पण तसा सम्रंभ निर्माण केला जात आहे. महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा हा प्रकार असून याचाच खूलासा करण्यासाठी मी माध्यमासमोर आलो असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.
मतमोजणी थांबवल्याने राऊतांची टीका
भाजपचा आक्षेप त्यानंतर निवडणूक आयोगाने घेतलेली दखल त्यानंतर थांबलेली मतमोजणी यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या संतप्त भावना ट्विटमधून व्यक्त केल्या. महाराष्ट्रात असाच खेळ सुरु आहे ‘घटीया पाॅलिटीक्स’ हे त्यांचे एक ट्विट असून राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? असा सवाल करुन त्यांनी ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला अशी टीका करीत आम्हीच जिंकू असा विश्वासही व्यक्त केला आहे.
काॅंग्रेसचाही आक्षेप
आता आयोगाचा पावित्रा काय असेल हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे, या गोष्टींमुळेच निवडणूक प्रक्रीयेला सुमारे एक तास उशीर झाला आहे. तत्पुर्वी आमदारांचे मतदान पुर्ण झाले असून मतमोजणीलाही सुरूवात झाली. काँग्रेसचे अमर राजूरकर यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे.
यात जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सूहास कांदे यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला. नवाब मलिकांना हायकोर्टाचा पुन्हा झटका, विशेष पीएमएलए न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.
- हायकोर्टाच्या निकालानंतर नवाब मलिकांनी याचिकेतील जामिनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी करत पुन्हा नव्याने याचिका केली. मात्र, ही याचिका ऐकूण घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे नवाब मलिकांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
- शिवसेनेच्या 42 आमदारांची पहिल्या पसंतीची मते संजय राऊत यांना
- संजय पवार यांना शिवसेनेच्या 13 आमदारांची पहिल्या पसंतीची मते
- राष्ट्रवादीची 2 आणि काँग्रेसची 9 मतते संजय राऊतांना
- विधानभवनात शिवसेना व काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू, दोन्ही पक्षांच्या मतदानानंतर आकडेवारीवर खल
- एमआयएमच्या दोन आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा
- भाजपकडून जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतांवर आक्षेप, मात्र अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळला
मतदानाचा पहिला मान
आज निवडणुकीमध्ये मतदानाचा पहिला मान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मिळाला. सर्वात पहिले मतदान भरणे यांनी केले. मतदान झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पहिले मतदान करण्याचा मान मिळणे हा पहिला कौल आमच्या बाजूने लागला आहे. आज दिवसभर महाविकास आघाडीचाच बोलबाला राहणार आहे. आमचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सायंकाळी 7 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार
आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत आमदारांना मतदान करता येणार आहे. त्यानंतर मतमोजणी होऊन सांयकाळी 7 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल. राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला पसंतीक्रम (1, 2, 3, 4, 5 आणि 6) दिला जातो. 42 किंवा अधिक सदस्यांनी उमेदवाराला प्रथम पसंती दिल्यास तो निवडून येतो. विधानसभेतील एकूण 288 सदस्यांपैकी शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाले असून अनिल देशमुख-नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी मिळाली नाही तर मविआला फटका बसण्याची शक्यता आहे.
असे आहे पक्षीय बालाबल
आघाडी + – 167
शिवसेना – 55
राष्ट्रवादी – 51 (दोन सदस्य तुरुंगात)
काँग्रेस – 44
अपक्ष – 9
किशोर जोरगेवार (चंद्रपूर), गीता जैन (मीरा भाईंदर), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), आशिष जयस्वाल (रामटेक), संजय शिंदे (करमाळा), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), मंजुळा गावित (साक्री), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र यड्रावकर (शिरोळ).
छोटे पक्ष – 8
समाजवादी पार्टी – 2, प्रहार जनशक्ती पार्टी – 2, माकप – 1, शेकाप – 1, स्वाभिमानी पक्ष – 1, क्रांतिकारी शेतकरी पार्टी – 1