भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध– खासदार प्रफुल पटेल

0
48

साकोली येथे खासदार प्रफुल पटेल यांचे जंगी स्वागत

साकोली,दि.११::. मागील बत्तीस वर्षापासून मी संसदेचे काम करीत आहे चार वेळा लोकसभा आणि तीन वेळा राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे तर एकदा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केलेले आहे मी जरी लोकसभा व राज्यसभा वर असलो तरी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यावर माझे विशेष प्रेम असते दोन्ही जिल्ह्याच्या विकास कसा करायचा हा नेहमी माझ्या डोक्यात असते माझे वडील स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांनीही भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली वडिलांची परंपरा म्हणून आजही भंडारा व गोंदिया जिल्ह्यासाठी कटिबद्ध आहे
असे मत नवनियुक्त राज्यसभा सदस्य खासदार प्रफुल पटेल यांनी जुनी पंचायत समिती साकोली च्या प्रांगणात साकोली वासियं तर्फे नागरी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले यावेळी मंचावर माजी आमदार राजेंद्र जैन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे आमदार चंद्रिकापुरे जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर विधानसभा अध्यक्ष हेम कृष्ण वाडीभस्मे माजी मंत्री नाना पंचबुद्धे माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर समरीत तालुका अध्यक्ष अंगराज समरीत माजी उपसभापती सुरेश कापगते शहर उपाध्यक्ष निखिल जीपकाटे उपस्थित होते खासदार पटेल पुढे म्हणाले की भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या मी जेव्हा खासदार होतो त्यावेळी साकोली तालुक्यातील मुंडीपार येथे भेल कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली मात्र नंतर लागलेल्या निवडणुकीत भंडारा-गोंदिया वासियांनी मला नाकारून ुसर्‍याला संधी दिली परिणामी भेल कारखाना बंद पडला विकास कामात कोणी अडथळा आणतो याची सर्वकष माहिती आपल्याला माहीत असून सुद्धा आपण विकास करणाऱ्या माणसाला नाकारत असता तरीही मी आपल्या मनात कधी ठेवत नसतो मी लोकसभा किंवा राज्यसभेवर असलो तरी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा विकास कसा होईल याकडे लक्ष देतो सध्या केंद्र शासनाने धान खरेदी वर मोठे निर्बंध लावलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे मात्र स्थानिक खासदार व आमदार यांनी यावर तोडगा काढायला पाहिजे मात्र ते शांत बसले आहेत फक्त निवडणुका आले की आश्वासन देऊन मोकळे होणार या लोकप्रतिनिधींना आता शेतकऱ्यांच्या बाबतीत जागे होण्याची गरज आहे मात्र तसे होत नाही तरी येथे एक दोन दिवसात मी दिल्लीला केंद्र शासनातर्फे धान खरेदी केंद्र थोडगा कडून शेतकऱ्याचे संपूर्ण धान खरेदी कसे करता येईल यावर तोडगा काढणार आहे
साकोली येथे खासदार प्रफुल पटेल यांचे नागरी सत्कार प्रसंगी प्रफुल पटेल यांचे ढोल ताशे च्या गजरात व आतिषबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी पोलीस पाटील संघटना श्री संताजी तेली समाज संस्था साकोली शिक्षक कर्मचारी संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम संघटना मुस्लिम समाज समिती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघटना युवा छत्रपती ग्रुप फ्रीडम युथ फाउंडेशन व श्रीराम जनसेवा संघटना यांच्या तर्फे खासदार प्रफुल्ल पटेल यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन अनिल टेंभरे यांनी केले कार्यक्रमाला प्रभाकर सपाटे फजल खान सुरेश सिंग बघेल सविता ब्राह्मणकर शंकर ब्राह्मणकर नरेश भुरे जया भुरे एडवोकेट मुन्ना अग्रवाल यशपाल कऱ्हाडे ,दर्शन कटकवार,नाग बोधी गजभिये डॉक्टर अनिल शेंडे सतीश समरीत सरपंच रामचंद्र कोहळे उपस्थित होते