
गोंदिया – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांच्यावर ईडीची चौकशी सुरू आहे. सुडभावनेतून ही चौकशी सुरू असून विनाकारण प्रकरणात गोवण्यात येत आहे. तेव्हा या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने १७ जून रोजी गांधी चौकात जनआंदोलन करण्यात येणार आहे.
सविस्तर असे की, सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ई.डी. कार्यालयाने नोटीस पाठवुन चौकशीसाठी बोलाविले. ई.डी. विभागाचे अधिकारी हे कटकारास्थान करुन या दोघांनाही कोणत्याही क्षणी अटक करु शकतात. त्या अनुषंगाने १७ जून रोजी सकाळी ११ वाजता येथिल गांधी चौक येथे जमा होऊन जयस्तंभ चौकात जेलभरो जन आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सदर जन आंदोलनाला काँग्रेस पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष, जि.प. व पं.स. सदस्य, तसेच जिल्हास्तराचे पदाधिकारी, सर्व फंटल, विभागाचे व सेलचे पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहवे. असे आव्हान काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बंसोड यांनी केले आहे