गोंदिया,दि.17ः केंद्र सरकार कडून अग्निपथ योजनेन्तर्गत अग्निवीर ही मोहीम काढण्यात आली आहे. ही योजना लाखो युवका करिता खुप प्रेरणादायक आणि लाभदायक ठरू सकते असे प्रतिपादन भाजयूमोचे जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांनी सांगितले आहे.ज्या प्रमाणे इजरायल सारख्या देशात 12 वी नंतर फक्त 2 वर्षा करिता सैन्य भर्ती अनिवार्य केली जाते. त्याप्रमाणे भारत सरकारची अग्निपथ योजना आजच्या युवकाना देशभक्ति करण्यास प्रेरित करेल व जिथे लाखो युवक 18 ते 23 वर्षात बेरोजगार राहतात त्याना सक्षम बनाविन्याकरिता खुप महत्वपूर्ण ठरेल असेही ते बोलले.
अग्निपथ मुळे सेनेचे युवाकरण होत असतांना, युवकांना दिशाभूल करवून विरोधक स्वत:ची पोळी शेकत आहे.
४ वर्षानंतर २५% लोकांना गुणवत्तेच्या आधारे सैन्यदलातच कायम तर ऊर्वरित जणांना निश्चितच अन्य ठिकाणी नौकरी मिळणारच कारण तिथून वापस येणारे सर्वच शिस्तीतील व स्किल्ड असणार आहे. तर युपी सारख्या राज्यांनी अशांना पोलीसदलात सामावून घेण्याचे जाहीर केले आहे. शिवाय स्वत:ची टॅक्समुक्त मोठी रक्कम हाती राहणार आहेच. ज्याच्या आधारे स्वत:चा व्यवसाय पण सुरू होवू शकतो. देशासाठी दोन-चार वर्ष दिल्याने युवक बेरोजगार नक्की राहणार नाही, ईतकी काळजी आजचा देशाभिमानी समाज नक्कीच घेणार याची खात्री मला नक्कीच आहे.नेमकी योजना किमान सर्वांनी वाचून नक्की घ्यावी असे निवेदन भाजयूमो अध्यक्ष ओम कटरे यांनी केले आहे.