लाखांदूर,दि.13ः- भंडारा जिल्हा भेटीवर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ या येत असून भंडारा येथे दि.16 नोव्हेबंरला येत असून त्या निमित्ताने लाखादूंर येथे महिला आघाडीची आढावा बैठक भंडारा जिल्हा पालक रचनाताई गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या बैठकीला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा इंद्रायांनी कापगते,तालुका भाजप अध्यक्ष विनोद ठाकरे,शहर अध्यक्ष कांचन गहाणे,धनवंता राऊत,लाखांदूर तालुका महिला अध्यक्ष कविता राऊत,सोफिया पठाण,वेणु कोटरानगे,प्रिया धकाडे,माधुरी हुकरे,ज्योती रामटेके यांच्यासह नगरसेविका तालुका महीला मोर्चा पदाधिकारी व क्षेत्रातील सरपंच महीला उपस्थित होते.
लाखांदुर नगर पंचायतच्या नगरसेविका श्रीमती सोफिया पठाण यांचा जन्मदिन केक कापुन सर्व महिलांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रवासा दरम्यान पालांदुर येथील जुन्या भाजपाच्या कार्यकर्ता व माजी पदाधिकारी प्रतिभाताई सेलोकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत 16 तारखेला होणार्या महीला मेळाव्याचं निमंत्रण दिले.