भंडारा,दि.२१ः-भाजपा महिला मोर्चा जिल्हा भंडारा तर्फे श्रद्धा आफताब प्रकरणी आरोपी आफताबला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीला घेऊन भंडारा,साकोली व तुमसर भाजप महीला मोर्चाव्दारे तहसिलदारमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना निवेदन पाठवण्यात आले.निवेदनात श्रद्धाचा जो निर्दयीपणे खून करण्यात आला,तिला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका व्यक्त करण्यात आली.निवेदन देतेवेळी जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष ईंद्रायणी कापगते,प्रदेश कार्यकारीणी सदस्य रेखाताई भाजिपाले, महिला मोर्चा भंडारा जिल्हा प्रभारी रचनाताई गहाणे,धनवंताताई राऊत,मंजिरी पनवेलकर महीला मोर्चा महामंत्री,माला बगमारे शहर अध्यक्ष,वनिता कुथे,रोशनी पडोळे जिल्हा उपाध्यक्ष,साधना त्रिवेदी,आशाताई उईके,चंद्रकला भोपे,मधुरा मदनकर,गीता सिडाम,प्रिती डोंगरवार,अर्चना श्रीवास्तव,श्रद्धा डोंगरे,गिता बोरकर,रजनी करंजेकर,वर्षा परमार,कल्पना कापगते,कुंदा मुंगुलमारे,पुष्पा कापगते,शकुंतला गिरेपुंजे,भुमिता धकाते यांच्यासह कार्यकर्त्या उपस्थित होत्या.